रस्ता
सुरक्षा सप्ताह कार्यक्रम सुरु
विविध
ठिकाणी रस्ता सुरक्षा कार्यक्रमाची जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि.23
: जिल्ह्यात
पोलीस अधीक्षक कार्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने
दि. 22 जून ते 29 जून, 2022 या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत आज दि. 23 जून, 2022 रोजी सेनगाव तालुक्यातील महामार्गावरील शाळा व काही
गावामध्ये विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यामध्ये सेनगाव येथील
मातोश्री लक्ष्मीबाई येवले प्राथमिक विद्यालय, तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान
महाविद्यालयात व कोळसा येथील विद्यानिकेतन विद्यालयात संस्थेचे प्राचार्य,
प्राध्यापक वृंध्द, विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना तसेच उपस्थित वाहनचालक व
प्रवाशांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करुन रस्ता सुरक्षिततेची शपथ देण्यात
आली. यावेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केलेल्या रस्ता सुरक्षा
मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात आले.
तसेच सेनगाव टी पॉईंट,
पुसेगाव टी पाँईट, जिंतूर टी पाँईट, हट्टा टी पॉईंट येथे उपस्थित चालकांना एकत्रित
जमवून त्यांना रस्ता सुरक्षेबाबत नियमाचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. नरसी,
पानकन्हेरगाव व सवड येथील ग्रामपंचायतींना भेटी देऊन वाहतूक नियमांबाबत व
पावसाळ्यात अपघात कसे टाळावेत याबाबत माहिती देण्यात आली. या पथकातील सहायक मोटार
वाहन निरीक्षक पवन बानबाकोडे, मनोजकुमार कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेगे यांनी
मार्गदर्शन करुन रस्ता सुरक्षा शपथ दिली. या पथकामधील पोलीस कर्मचारी घुमनार,
सावळे, गवळी, घुगे व चालक भुताळे यांनी सहकार्य केले.
हा कार्यक्रम पोलीस
अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशंवत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीष
देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत
आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment