हिंगोली जिल्ह्यातील 30 स्थळांना क वर्ग पर्यटनाचा दर्जा
देण्यास मान्यता
जिल्हा वार्षिक योजनेच्या 2021-22 या आर्थिक वर्षातील 229
कोटी 43 रुपयाच्या खर्चास मान्यता
सन 2022-23 चा जिल्हा वार्षिक योजनेचा प्राप्त निधी वेळेत
खर्च करावा
- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड
हिंगोली, दि. 24 (जिमाका)
: जिल्हा नियोजन समितीची आज ऑनलाईन बैठक घेऊन सन 2021-22 मध्ये जिल्हा
वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी योजनेत एकूण 229 कोटी
62 लाख 51 हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी जिल्ह्यात विकास कामावर
झालेल्या 229 कोटी 43 लाख रुपयाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. तसेच आगामी
वर्षात 270 कोटी 21 लाख 71 हजार रुपयाचा निधी खर्च करण्यासाठी प्रस्ताव सादर
करण्याचे निर्देशही पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी दिल्या. तसेच
जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2022-23 चा प्राप्त निधी वेळेत खर्च करण्यासाठी कामाना
मंजुरी देण्यास मान्यता देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजनेच्या
सर्वसाधारण योजनेतंर्गत सन 2022-23 या वर्षासाठी प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन
करुन जिल्ह्यातील विकास कामांवर वेळेत खर्च करावा, अशा सूचना राज्याच्या शालेय
शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या.
आज जिल्हा नियोजन समितीची
ऑनलाईन बैठक राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री
प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार सर्वश्री
तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, ए.एल.
बोंद्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ.शिवाजी पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हिंगोली
जिल्ह्यातील विकसित होऊ शकणाऱ्या 28 पर्यटन स्थळासह आमदार तान्हाजी मुटकुळे आणि
आमदार राजू नवघरे यांनी सुचविलेल्या अशा एकूण 30 स्थळाना क वर्ग पर्यटनाचा दर्जा
देण्यासाठी या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील जास्तीत पर्यटन स्थळाला ब
दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी
दिल्या.
सन 2022-23 मध्ये हिंगोली
जिल्ह्यासाठी प्राप्त निधीतून 11.40 कोटी रुपये शासनाकडून मार्गदशक सूचना प्राप्त
झाल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी देण्याबाबत मान्यता देण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व
निजामकालीन शाळांच्या इमारती धोकादायक झाल्या असून त्याचे नुतनीकरण करण्यासाठी
राज्याकडून 90 टक्के निधी मिळणार देण्यात येणार आहे. उर्वरित 10 टक्के लोकवाटा
जिल्ह्यातील आमदारांनी आपल्या मतदार संघातील शाळा दुरुस्तीसाठी आमदार निधीतून
द्यावा, अशी विनंती केली.
यावेळी आमदार राजू नवघरे
यांनी बाभुळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक
योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.
यावेळी बैठकीस जिल्हा
नियोजन समितीचे सदस्य यांच्यासह सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती
होती.
****
No comments:
Post a Comment