आंतरराष्ट्रीय योग
दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा
प्रशासन व पतंजली योग समिती, योग विद्याधाम, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने
दि. 21 जून, 2022 रोजी सकाळी 6-00 ते 7-00 वाजे दरम्यान योग शिबिराचे आयोजन
करण्यात आले आहे.
या योग शिबिराचा लाभ सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी,
कर्मचारी व जनतेनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment