धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य शाळांनी
पायाभूत सोयी सुविधांच्या अनुदानासाठी अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 20 : हिंगोली
जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना
अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व अंपग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा
पुरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दि. 07 ऑक्टोबर, 2015 च्या शासन निर्णयान्वये ही
योजना राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षासाठी अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव
मागविण्यात येत आहेत.
या योजनेंतर्गत धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी
बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ
महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व अंपग
शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी इच्छुक शाळांकडुन शासन निर्णयात
नमूद केलेला विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज टंकलिखित करुन परिशिष्ट अ प्रमाणे
शाळेचे संपूर्ण नाव, आवश्यक कागदपत्रासह सविस्तर प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती,
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. 31 जुलै, 2022 पर्यंत सादर करावा.
त्यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन
अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment