वसमत तालुक्यातील वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे तातडीने
पंचनामे करावेत
--पालकमंत्री वर्षा गायकवाड
हिंगोली (जिमाका) दि. 9 : वसमत तालुक्यातील पूर्व भागातील गिरगांव, सोमठाणा , पार्डी बु.
गावांना बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्याचा
जोरदार तडाखा बसला. यात विशेषत: शेतातील केळी बागांचे व पिकांचे आतोनात
नुकसान झाले आहे. त्याचे तातडीने पंचनामे
करण्याचे आदेश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
या वादळी वाऱ्यामध्ये जनावरेही दगावली तसेच वादळी वाऱ्याचा वेग एवढा जास्त होता की,
हजारो घरावरील पत्रे उडून गेली, अनेक ठिकाणी
विजेचे खांबही पडले, सुसाट्याच्या वाऱ्यात झाडे
पडल्याने झाडाखाली दबून मोटारसायकलींचेही मोठे नुकसान झाले, या वादळी
वाऱ्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून तलाठी, कृषी सहायक व
ग्रामसेवक यांच्याकडून वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पिकांचे आणि घराच्या नुकसानीचे तातडीने
पंचनामे करून शेतपिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निर्देश जिल्ह्याच्या
पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
00000000
No comments:
Post a Comment