टोल फ्री क्रमांक व क्रॉप
इन्शुरन्स ॲप्लीकेशनद्वारे
फळपिकांच्या नुकसानीची पूर्वसूचना देण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका) दि. 10 : विमा योजना आंबिया बहार 2021-22
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हवामान आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार
2021-22 जिल्ह्यात एच.डी.एफ.सी. ऍग्रो ज.
इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुंबई
यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. दिनांक 8 जून रोजी वादळी वारे, वेगाचे वारे या स्थानिक
आपत्तीमुळे केळी फळ पिकाचे नुकसान झाले आहे.
ज्या शेतकऱ्याने केळी या फळपिकाचा आंबिया बहारासाठी विमा उतरविला
आहे व ज्यांचे वेगाचा वारा या जोखमी अंतर्गत
फळपिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना टोल फ्री
क्रमांक 18002660700, pmfby.maharashtra@hdfcergo.com आणि क्रॉप इन्शुरन्स ॲप्लीकेशन (प्ले स्टोअर वर
उपलब्ध) या माध्यमातून विमा कंपनी, कृषी विभाग किंवा बँकेत द्यावी असे आवाहन
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment