राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करा
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
*
0 ते 5 वर्षे वयोगटातील 1 लाख 33 हजार 806 बालकांना 03 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण
हिंगोली (जिमाका), दि.
13 : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक
03 मार्च, 2024 रोजी राबविण्यात येणार आहे. बालकाच्या संपूर्ण सुरक्षितेसाठी पोलिओचा
डोस अत्यावश्यक आहे. या दिवशी 5 वर्षाखालील सर्व बालकांसाठी आयोजित करण्यात येणारी
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तसेच सर्व संबंधित
यंत्रणांनी समन्वयाने काम करुन मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पल्स पोलिओ
लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा दक्षता समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री.
पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश
रुणवाल, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सुनील देशमुख, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कुऱ्हाडे, तालुका आरोग्य
अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, डॉ.संदीप काळे, डॉ.अनुराधा गोरे, डॉ.बालाजी भाकरे, डॉ.हरणे
तसेच महिला बाल कल्याण विभाग, शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी,आरोग्य सहाय्यक डी.
आर. पारटकर, सुनील मुनेश्वर, मुनाफ इत्यादी उपस्थित होते.
यावेळी
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
सतीश रुणवाल यांनी जिल्ह्यात दि. 03 मार्च,2024 रोजी 0 ते 5 वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील
1 लाख 33 हजार 806 पात्र लाभार्थी बालकांना पोलिओ लस दिली जाणार आहे. यासाठी 1160 बूथ,
जिल्हास्तर व तालुकास्तर अधिकारी पर्यवेक्षक-62 असे नियोजन करण्यात आले आहे. दि. 3
मार्च, 2024 रोजी पोलिओ लसीकरण मोहीम व आयपी आयपीआय हा ग्रामीण भागात 3 दिवस व शहरी
भागात 5 दिवस राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
******
No comments:
Post a Comment