सैनिक कल्याण
विभागातील विविध पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 05 : सैनिक कल्याण विभागाच्या
अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कार्यालयातील गट-क मधील कल्याण संघटक, वसतिगृह
अधीक्षक, अधीक्षिका, कवायत प्रशिक्षक या सरळ सेवेतील पदांची भरती टीसीएस आयओएन यांच्यामार्फत करण्यात येणार
आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात/सूचना सैनिक कल्याण विभागाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा सैनिक कक्ष, हिंगोली यांच्या फलकावर
लावण्यात आलेली आहे. यासाठी दि. 12 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून
दि. 3 मार्च, 2024 रोजी सांय. 6.00 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
पदनिहाय आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
कल्याण संघटक : या पदासाठी जिल्ह्यातील
ज्या माजी सैनिकांचे वय दि. 01 एप्रिल, 2024 रोजी 50 वर्षापेक्षा जास्त नाही अशा
माजी सैनिकांना कल्याण संघटक पदासाठी अर्ज करता येणार आहे. सशस्त्र दलात 15 सेवा
झालेली असावी. तसेच भूदलात सुभेदार दर्जापेक्षा कमी नसेल अशा पदावर किंवा नाविक
दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली असावी. अशा माजी सैनिक
उमेदवारांची नियुक्ती सरळ सेवेमार्फत टीसीएस कंपनीद्वारे ऑनलाईन पध्दतीने
कॉम्प्यूटर बेसड् टेस्ट द्वारे होणार आहे.
वसतिगृह अधीक्षक : सशस्त्र दलात 15 वर्षाची
सेवा झालेली असावी. भूदलात कनिष्ठ राजदिष्ठ अधिकारी म्हणून किमान 5 वर्षे सेवा
केलेली आहे किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली
अशा माजी सैनिक उमेदवारांचे वयोमर्यादा दि. 01 एप्रिल, 2024 रोजी 45 वर्षापेक्षा
जास्त नसावे. तसेच या पदासाठी ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम
परीक्षा उत्तीर्ण झाले असल्याची शैक्षणिक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
वसतिगृह अधिक्षिका : भारताच्या
सशस्त्र दलात सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकांच्या पत्नीची नियुक्ती अटी पूर्ण
करणाऱ्या योग्य महिला उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येणार आहे.
वयोमर्यादा दि. 01 एप्रिल, 2024 रोजी 45 वर्षापेक्षा जास्त नसावी. ज्यांनी
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले शैक्षणिक
अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
कवायत प्रशिक्षक गट-क : सशस्त्र दलात
15 वर्षाची सेवा झालेली असावी. भूदलात कनिष्ठ राजदिष्ठ अधिकारी या पदावर किंवा
नाविक दलात अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली असावी. ज्यांनी संरक्षण
दलातील कवायत प्रशिक्षण धारण केलेले आहे अशा माजी सैनिक उमेदवारांसाठी अटी पूर्ण
करणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी
वयोमर्यादा दि. 01 एप्रिल, 2024 रोजी 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच या पदासाठी
ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेली शैक्षणिक
अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
अधिक
माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा
सैनिक अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment