खादी व ग्रामोद्योग
मंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी
8 फेब्रुवारी रोजी एक
दिवशीय जनजागृती शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 06
: महाराष्ट्र
शासनाच्या उद्योग व कामगार विभागाच्या दि. 18 जून, 2019 च्या शासन निर्णयान्वये
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र (मधमाशापालन) संपूर्ण
राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेंतर्गत महिला, युवक-युवती, सुशिक्षित
बेरोजगार, आदिवासी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्ग, भटक्या
विमुक्त जमाती, स्वातंत्र्य सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंसहाय्यता
युवा गट, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, पारंपारिक कारागीर इत्यादी समाजातील सर्वच
घटकांना मध योजनेचा लाभ देण्यात येतो. याशिवाय महाराष्ट्र राज्य खादी व
ग्रामोद्योग मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार
निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना इत्यादी योजना
राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी
अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो. मध योजनेंतर्गत लाभ
घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था
मंडळामार्फत करण्यात येते.
वरील योजनेची माहिी व
लाभ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी मंडळाच्या योजनाची माहिती देण्यासाठी दि.
8 फेब्रुवारी, 2024 रोजी तालुका कृषि अधिकारी, फळ रोप वाटिका, परभणी रोड वसमत येथे
सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 यावेळेत एक दिवशीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात
आले आहे. या मेळाव्यामध्ये शासनाचे कृषि विभाग, वन विभाग, पंचायत समिती आदी शासकीय
कार्यालयांचा सहभाग सुध्दा असणार आहे. या मेळाव्यात प्रवेश निशुल्क असून
इच्छुकांची नाव नोंदणी करुन त्यांचे फॉर्म भरुन घेण्यात येतील. या शिबिरात सहभागी
व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात आले
आहे.
******
No comments:
Post a Comment