17 February, 2024
गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गत डॉक्टरला ठोठावली शिक्षा
हिंगोली (जिमाका), दि. 17 : गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम-2003 (पीसीपीएनडीटी) या कायद्यांतर्गत धडक मोहीम राज्यात राबविण्यात आली होती. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांनी त्यांच्या टीमसह निदान डायग्नोस्टिक सोनोग्राफी सेंटर तपासणी केली असता त्यांना सोनोग्राफी सेंटरमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे सुदेश भरतिया या डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. डॉक्टर बोल्डे यांनी न्यायालयात फिर्यादी म्हणून पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत डॉक्टर सुदेश भारतियाविरुद्ध प्रकरण दाखल केले होते. त्या कार्यक्रमांमध्ये विधी समुपदेशक म्हणून वेळोवेळी ॲड. सुकेशिनी ढवळे-हादवे यांनी पीसीपीएनडीटीचे कामकाज पाहिले होते.
त्या अनुषंगाने सहाय्यक सरकारी वकील निखिल चंदेल यांनी अंतिम युक्तिवाद करण्यास मदत केली होती. या प्रकरणात चार साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.जी. देशमुख यांनी निकाल देताना न्यायालयापुढे आलेल्या पुरावाच्या आधारे डॉ.भरतिया याला पीसीपीएनडीटी कायद्याअन्वये कलम 17 (2) व नियम 9 (8) अन्वये दोन महिने साधा कारावास व एकूण दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस एस .बी. तोडेवाले यांनी मदत केली.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment