02 February, 2024

 

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न


 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 02 :   कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत ग्राम बाल संरक्षण समितीचे पुन:र्गठन करुन या समितीत नव्याने 20 ते 30 वयोगटातील बाल मित्र निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली .

            या बैठकीत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकासंदर्भात निर्माण होणाऱ्या समस्यांचा शोध घेऊन त्या समस्यांचे निवारण करण्याबाबत चर्चा करण्यात आली . ग्राम बाल संरक्षण समितीचे रचना फलक ग्राम पंचायत कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविण्यात येते. याबाबत सविस्तर माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी दिली.

            यावेळी शेवाळा येथील ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनंता नरवाडे, ग्रामसेवक पी. डी. जाधव, तलाठी आर. डी. गिरी, कृषि सहायक वाघमारे, माजी सरंपच अभय सावंत, पोलीस पाटील स्वप्नील गांजरे, आशा वर्कर, चाईल्ड हेल्पलाईनचे कसे वर्कर तथागत इंगळे तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती इत्यादी उपस्थित होते.

*******

No comments: