16 February, 2024
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय
स्वयंम योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि. 16 : राज्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी धनगर समाजातील असावा, इयत्ता 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण असावेत, 12 वी नंतर मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा, जात वैधता प्रमाणपत्र जोडावे, पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे, शैक्षणिक संस्था असलेल्या शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा, विद्यार्थी हा हिंगोली शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा, इयत्ता 12 वी नंतर मान्यतापा्रप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 5 वर्षे योजनेचा लाभ घेता येईल, वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे, अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेला तसेच शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी सुध्दा पात्र असेल. तथापि, सदर विद्यार्थी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपक्षा अधिक वयाचा नसावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र, प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील, धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ प्राथम्याने देय राहील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांस ऑफलाईन पध्दतीने सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील, असे आवाहन यादव गायकवाड, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment