29 February, 2024
चर्मकार बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा - अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी • ‘लिडकॉम आपल्या दारी’ची कार्यशाळा संपन्न
हिंगोली (जिमाका), दि 29 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संत रोहिदास चर्माद्योग आणि चर्मकार विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार आणि शैक्षणिक कर्ज पुरवठा केला जातो, याचा चर्मकार बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि व्यवस्थापकीय संचालक धम्मदीप गजभिये यांच्या मार्गदर्शनात ‘लिडकॉम आपल्या दारी’ मोहिमेंतर्गंत ही कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात पार पडली. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी बोलत होते.
यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, प्रल्हाद वाघमारे, महादेव खंदारे, सिद्धार्थ गोवंदे, गोविंद असोले, अरुण राऊत आदि उपस्थित होते.
महामंडळाने आणि समाजबांधवांना सुवर्ण जयंती वर्ष आणि संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच या युवकांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन उच्च शिक्षण व व्यवसायाकडे वळले पाहिजे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्री. केले.
मोहिमेत विविध शासकीय योजना राबविल्या जातात. तसेच महाराष्ट्रग उद्योजकता विकास केंदाचे सुधीर आठवले आणि सुभाष बोरकर यांनीही महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. बार्टीचे प्रकल्प समन्वयक सिद्धार्थ गोवंदे यांनीही बार्टीच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
चर्मकार महामंडळातर्फे कर्ज योजनेची माहिती व दिनदर्शिकांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. महामंडळाचे सुवर्ण महोत्स्वी वर्ष असून, लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यात आली असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अरुण राऊत यांनी केले. सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी तर विशाल कुबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव खंदारे, सचिव गजानन खंदारे, प्रल्हाद वाघमारे, आनंद इंगळे, दिगांबर मानकर, महादेव गाडेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment