27 February, 2024
महासंस्कृती महोत्सव अंतर्गत रांगोळी स्पर्धेला उदंड प्रतिसाद विजेत्यांना पारितोषिक वितरण
हिंगोली (जिमाका), दि. 27 : महासंस्कृती महोत्सव अंतर्गत रांगोळी स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
महासंस्कृती महोत्सवानिमित्त येथील रामलिला मैदानावर सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दोन गटात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, उपविभागीय अधिकारी क्रांतीताई डोंबे, उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेमध्ये दोन्ही गटातील सहभागी स्पर्धकांनी उत्तम रांगोळी रेखाटली. स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.
सायंकाळी महासंस्कृती महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात उपविभागीय अधिकारी क्रांतीताई डोंबे, सामाजिक कार्यकर्ते कल्याण देशमुख, मंडळ अधिकारी पोटे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये 18 वर्षे वयोगटाखालील प्रथम क्रमांक साक्षी रणजित चोरुडे, द्वितीय सायली धनराज भुसांडे, तृतीय हर्षदा गजानन मस्के यांना बक्षीस वितरण करण्यात आले. 18 वर्षे वयोगटावरील प्रथम क्रमांक किरण दत्तराव कुऱ्हे, द्वितीय वंदना नारायण भेंणे, तृतीय सोनिका नितीन शर्मा यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना प्रथम 18 वर्षे खालील वयोगटामध्ये प्रथम नऊ हजार, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार तर 18 वर्षेवरील वयोगटामध्ये प्रथम 11 हजार, द्वितीय नऊ हजार, तृतीय सात हजार रुपयांची रोख पारितोषिके जिल्हा प्रशासनाकडून धनादेशाद्वारे देण्यात येत आहेत.
या बक्षीस वितरणाचे सुत्रसंचालन शंतनू पोले यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजिका उपविभागीय अधिकारी क्रांतीताई डोंबे यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालिकेचे बाळु बांगर, आशिष रणशिंगे यांनी सहकार्य केले. स्पर्धेचे परिक्षण चित्रकला शिक्षक शिवाजी निळकंठे, रमेश थोरात, संगिता पतंगे, कैलास कावरखे यांनी केले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment