फिरते लोकन्यायालय व
शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि.01 : मा. उच्च न्यायालय, विधी व सेवा उपसमिती, औरंगाबाद
यांच्या पत्रान्वये परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये दि. 5 फेब्रुवारी ते दि. 23
फेब्रुवारी, 2024 या कालावधीत फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले
आहे. या फिरत्या लोक न्यायालय व शिबिरांच्या वाहनाचे उद्घाटन कार्यक्रम दि. 5
फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा न्यायालय परिसर, परभणी येथे
आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हा व तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या फिरते लोक
न्यायालय व शिबीर कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
हिंगोली
जिल्ह्यात दि. 6 फेब्रुवारी, 2024 रोजी वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम, चोंडी
अंबा, दि. 7 फेब्रुवारी रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी, गोळेगाव येथे,
दि. 8 फेब्रुवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील शिवणी, तुपा येथे, दि. 9 फेब्रुवारी
रोजी हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथे आणि दि. 12 फेब्रुवारी, 2024 रोजी
सेनगाव तालुक्यातील खुडज, नर्सी नामदेव येथे फिरते लोक न्यायालय व शिबिराचे आयोजन
करण्यात आले आहेत.
परभणी जिल्ह्यात दि. 13 फेब्रुवारी, 2024 रोजी जिंतूर
तालुक्यातील कौसडी, बोरी येथे, दि. 14 फेब्रुवारी रोजी येथे सेलू तालुक्यातील
निपाणी टाकळी, ढेंगळी पिंपळगाव येथे, दि. 15 फेब्रुवारी रोजी मानवत तालुक्यातील
अंबेगाव व सावरगाव येथे, दि. 16 फेब्रुवारी रोजी पाथरी तालुक्यातील हादगाव नखाते
येथे, दि. 17 फेब्रुवारी रोजी सोनपेठ तालुक्यातील सायखेडा व शेळगाव येथे, दि. 20
फेब्रुवारी रोजी गंगाखेड तालुक्यातील खादगाव व अकोली येथे, दि. 21 फेब्रुवारी रोजी
पालम तालुक्यातील केरवाडी व चाटोरी येथे, दि. 22 फेब्रुवारी रोजी पूर्णा
तालुक्यातील कानखेडा व ताडकळस येथे आणि दि. 23 फेब्रुवारी, 2024 रोजी परभणी
तालुक्यातील बलसा खुर्द व जिल्हा न्यायालय परभणी येथे फिरते लोक न्यायालय व शिबिराचे
आयोजन करण्यात आले आहेत. या फिरते लोक न्यायालय व शिबिराचा लाभ जास्तीत जास्त
नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
******
No comments:
Post a Comment