रस्ते सुरक्षा अभियानाच्या एलईडी वाहनाचा
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फित कापून केला शुभारंभ
हिंगोली
(जिमाका), दि. 07 :
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात
आलेल्या एईडी चित्ररथ वाहनाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते फीत कापून
शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजय दैने, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,
महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, तहसीलदार नवनाथ वगवाड,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटार वाहन निरीक्षक सर्वश्री. अतुल बानापूरे,
जगदीश माने, विकास नाईकवाडे, नलिनी काळबांडे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये
हेल्मेट युक्त हिंगोली, अपघात मुक्त हिंगोली यासह विविध कायदे नियम यांची जनजागृती
करण्यात येणार असल्याचे उप्र प्रादेशिक अधिकारी अनंता जोशी यांनी सांगितले.
******
No comments:
Post a Comment