29 February, 2024
‘उत्कर्ष बहुजनांचा’ मेळावा कार्यक्रमाचे आयोजन • पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार मेळाव्याचे उद्घाटन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘उत्कर्ष बहुजनांचा’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 4 मार्च, 2024 रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली येथे होणार आहे.
यावेळी विभागाच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना कळावी यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील नागरिकांना या योजनांचा लाभ घेता येईल. तसेच या मेळाव्यात विविध योजनांची माहिती देणारे स्टॉलही लावण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment