21 February, 2024
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 22 ते 24 फेब्रुवारीदरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्यामार्फत दि. 22 ते 24 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा.लि.पुणे या कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर, असेंब्ली, क्वालिटी चेकरच्या 30 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून, या पदासाठी 14 हजार ते 16 हजार वेतन देण्यात येणार आहे. तसेच श्री दत्तगुरु फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी प्रा.लि. कळमनुरी या कंपनीमध्ये सुपरवायझर पदाच्या 10 जागा भरण्यात येणार असून यासाठी बारावी, डिप्लोमा, पदवीधर असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. या पदासाठी मासिक वेतन 8 हजार ते 10 हजार देण्यात येणार आहे.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात युवाशक्ती स्कील इंडिया प्रा. लि. पुणे व श्री दत्तगुरु फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी प्रा.लि.कळमनुरी या कंपनीचे 40 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. इच्छुकांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल.
याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनीवर किंवा 7385924589, 7972888970 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment