17 February, 2024
नांदुरा येथे बालकाचे संरक्षण कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 16 : महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांच्या सूचनेनुसार नुकताच नांदुरा येथे लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी चाईल्ड हेल्पलाईन राजरत्न पाईकराव यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण कायदा २०१२ नुसार चांगला स्पर्श, वाईट स्पर्शाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून सांगितले. चाईल्ड हेल्पलाईनचे विकास लोणकर यांनी ० ते १८ या वयोगटातील बालकांच्या संकट समय चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या ट्रोल क्रमांकाचे प्रात्यक्षिकासह महत्त्व समजावून सांगितले व श्रीकांत वाघमारे यांनी अनाथ प्रमाणपत्र व धम्मप्रिया पखाले यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची माहिती दिली. मुख्याध्यापक श्री. मगर, सहशिक्षक श्री. भाकरे, श्री. मुटकुळे, श्रीमती उषा कांबळे, श्रीमती पार्वती तनपुरे यांची उपस्थिती होती.
*********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment