27 February, 2024
‘लख लख चंदेरी’ने महासंस्कृती महोत्सवाचा थाटात समारोप
• ‘केशर केवडा’तून लावण्यांचा ठेका
हिंगोली (जिमाका), दि. 27 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून येथील रामलीला मैदानावर महासंस्कृती महोत्सवातून विविध सिनेअभिनेत्री आणि स्थानिक कलाकार, हास्यकवी, यांच्या कला सादरीकरणाने हिंगोलीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली. यामध्ये समारोपीय कार्यक्रमांमध्ये ‘लख लख चंदेरी’मधून पुष्कर श्रोत्रीच्या खुमासदार सूत्रसंचालनाने समारोपीय कार्यक्रम चांगलाच गाजला.
कार्यक्रमात गायिका आनंदी जोशी असे कसे बोलायचे आता, तुझा छंद लागला, सैराटमधील ‘आताच बया का बावरलं, आदी एकापेक्षा एक गितांनी उपस्थितांमध्ये जल्लोष भरला. नेहा खान, दिव्या सिंग, ‘चंद्रा’ या लावणीला रसिकांकडून वन्स मोअर मिळाला, मोनिका ओ माय डार्लींग, मयुर सुकाळेच्या बाई माझ्या गं दुधात नाही पाणी या गवळणीत उपस्थित तल्लीन झाले होते. आनंदी जोशीच्या हात नका लावू जी पाहील कुणीतरी, तसेच शांतनू पोलेच्या ‘कोरलायं शिवबा काळजावर’वर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे नृत्य केले. तर ही पोली साजूक तुपातली… सामूहिक गिताने समारोप झाला.
तत्पूर्वी स्थानिक कलावंतांनी चारही दिवस आपल्या कलांचे सादरीकरण केले. यावेळी शाहीर नामदेव दिपके कलासंचाने मुलगी वाचवा मुलगी शिकवा, शाहीर प्रकाश दांडेकर कलासंचाने मतदार जनजागृती आणि महापुरुषांवरील राष्ट्रीय पोवड्यांचे सादरीकरण केले. तर प्राची पाईकराव या चिमुकलीने एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राज्याचं नाव गाजतयं गड किल्ल्याच्या दगडावर हे गीत अप्रतिमपणे सादर केले. सर्व कलावंत आणि स्थानिक कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तर रविवारी कौस्तुभ दिवाण यांच्या अप्रतिम सूत्रसंचालनाने ‘केशर केवडा’ आणि त्याला सन्मिता जटाळे, नेहा पाटील, आरती शिंदे, स्मिता शेवाळे, आय्ली घिलीया आणि ऐश्वर्या बडदे यांच्या तितक्याच अप्रतिम लावणी सादरीकरणाचा उपस्थितांनी आस्वाद घेतला.
सुरुवातीला कसं काय पाटील बरं हाय का, बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना, एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज, कोणीतरी न्या हो मला मिरवायला, गं बाई मी पतंग उडवीत होते, हात नका लावू माझ्या साडीला या लावणीसोबतच नेहा पाटीलच्या ‘चंद्रा’, मला जावू द्या ना घरी आता वाजले की बारा,रात्र धुंदीत ही गाजवा आणि कुठं कुठं जायाचं हनीमूनला, राया थेंबा थेंबानं केलयं मला गार.., पाडाला पिकलायं आंबा या एकापेक्षा एक वरचढ अशा लावणी सादरकीरणावर ऐश्वर्या बडदेने ‘शौकिनांचा मेळा भरला, डावा डोळा लवू लागला’ने कहरच केला. त्याशिवाय स्मिता शेवाळे हिच्या ‘नटरंग उभा’ लावणीने कार्यक्रमाची सांगता झाली या सर्व लावणींचे श्रीमती कांचन जाधव यांनी दिग्ददर्शन केले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment