07 February, 2024

 हिंगोली जिल्ह्यातील चर्मकार प्रवर्गातील युवक, युवती व महिलांसाठी

परिचय मेळावा व मुलाखतीचे आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 :  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित (लिडकॉम) पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) व्दारा आयोजित संत रोहिदास सुवर्ण जयंती उद्योजकता विकास प्रशिक्षण योजने अंतर्गत अनुसुचित जातीतील चर्मकार (चांभार, बोर, होलार व मोची) या प्रवर्गातील युवक, युवती व महिलांसाठी एक महिना कालावधीचा संपूर्ण मोफत स्वरुपाचा अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (EDP) दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 ते 20 मार्च, 2024 असा 30 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम हिंगोली येथे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दि. 15 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 11 वाजता रेनबो कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आदर्श कॉलेज, पाण्याच्या टाकीजवळ हिलटॉप कॉलनी हिंगोली येथे एक दिवसीय उद्योजकता विकास परिचय मेळावा व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय विकास, उद्योग कसा सुरु करायचा, विक्री कौशल्य, विविध क्षेत्रातील उद्योग संधी, कंपनी नोंदणी प्रक्रिया, शासकीय व निमशासकीय कर्ज योजना, उद्योगाची नोंदणी व परवाने माहिती, बाजारपेठ पाहणी प्रत्यक्ष उद्योग भेटी, अभिप्रेरणा प्रशिक्षण, शासनाचे औद्योगिक धोरण, मार्केटिंग तंत्र, उद्योग व्यवस्थापन, स्टॅन्डअप इंडिया, एक्सपोर्ट इन्पोर्ट माहिती, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रकल्प अहवाल इत्यादीचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता किमान 7 वी पास असावा व तो हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असावा. वयोमर्यादा किमान 18 ते 50 वर्षे असावी. उमेदवार हा अनुसुचित जातीतील चर्मकार (चांभार, ढोर, होलार व मोची) या प्रवर्गातील असावा. या प्रशिक्षणासाठी जातीचा दाखला, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट, पॅन कार्ड दोन प्रतीसह व दोन पासपोर्ट फोटो घेऊन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले (मो. नं. 9765291785), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक सुभाष बोरकर (मो.नं. 9921400577) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहनही प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: