29 February, 2024
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या त्रैमासिक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा घेतला.
यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठुले, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर केला. तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर, 2023 या मागील तिमाहीत केलेल्या एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाचा, अशासकीय संस्था विहान व लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाचा आढावा सादर केला. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 3829 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी झाली असून, त्यापैकी 1920 रुग्णांना औषधोपचार सुरु असल्याचे सांगत जिल्ह्यातील एचआयव्ही, एड्सबाबत सुविधा पुरविणाऱ्या केंद्राची माहिती दिली.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment