09 February, 2024

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

थेट कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 09 :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे विकास महामंडळामार्फत  मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादिगा या समाजातील दारिद्र्यरेषेखालील महिला/ पुरुष  घटकांच्या आर्थिक  उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एनएसएफडीसी  योजनेअंतर्गत 1) सुविधा कर्ज योजना रुपये 5 लाख 2) लघुऋण वित्त योजना रु. 1.40 लाख,            3) महिला समृध्दी योजना रु. 1.40 लाख, 4) देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक  कर्ज योजना  रु. 30 लाख व परदेशातील  अभ्यासक्रमासाठी रु. 40 लाख कर्ज प्रस्ताव सादर करण्यासाठी महामंडळाने https://beta.slasdc.org   हे ऑनलाईन वेबसाईट प्रणाली विकसित केली आहे. दि. 5 मार्च, 2024 रोजी महामंडळाची वेबसाईट बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मातंग समाजातील गरजू लाभधारकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज तात्काळ सादर करावेत. तसेच ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत जिल्हा कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अधिक माहितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, शासकीय दवाखान्याजवळ, हिंगोली येथील कार्यालयात येऊन संपर्क साधावा, असे आवाहन टी. आर. शिंदे,  जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, हिंगोली यांनी आवाहन केले आहे.

*******

No comments: