जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली हिंगोली शहरातील
मतदान केंद्राची पाहणी
हिंगोली (जिमाका), दि.
07 : आगामी लोकसभा
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली शहरातील माणिक स्मारक विद्यालय, सरजूदेवी
विद्यालय, जिल्हा परिषद गणेशवाडी, आदर्श महाविद्यालय, राजे संभाजी महाविद्यालय, मूकबधीर
विद्यालय आणि लिटील फ्लॉवर इंग्लीश स्कूल येथील एकूण 18 मतदान केंद्राची आज पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत सहायक मतदार
नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वगवाड, सी.आर. गोळेगावकर, टी. डी. कुबडे, के. एन.
पोटे, बी. के.वाबळे, व्ही. बी. सोमटकर, बाळू नागरे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment