07 February, 2024

 

गावात होणारे बालविवाह ग्राम बाल संरक्षण समितीने थांबवावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 07 : सन 2019-2020 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS) बालविवाहाच्या बाबतीत हिंगोली जिल्हा पाचव्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झालेले आहे. जिल्ह्यात बालविधाह समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हास्तरावर बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या कृती दलाच्या माध्यमातुन विविध नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविले जात आहेत. "बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा" होण्यासाठी प्रशासन कार्यस्त आहे. सोबतच आणल्या सर्वांचा पुढाकार व सक्रिय सहभाग अतिशय महत्वाचा आहे.

अशा अनिष्ट प्रथा नष्ट व्हाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने दि. 10 जून, 20214 च्या शासन निर्णयानुसार ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना केलेली आहे. ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच असून अंगणवाडी सेविका सदस्य सचिव आहेत. तसेच या समितीमध्ये आशा सेविका, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, महिला बचत गट प्रतिनिधी, बालमित्र दोन विद्यार्थी प्रतिनिधी (12 ते 18 वयोगटातील मुलगा व मुलगी) इत्यादीचा समावेश आहे. ग्राम बाल संरक्षण समितीच्या दरमहा अंगणवाडीमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये नियमित बैठका होणे अपेक्षित आहे.

जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये बालविवाह निर्मूलन करण्याच्या दृष्टीने सरपंचाच्या अध्यक्षतेखाली नियमित ग्राम बाल संरक्षण समितीच्या बैठका घेऊन आपल्या गावामध्ये बालविवाहाचे नियोजन होत आहे का ? याबाबत बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कोणाच्याही घरी बालविवाह होणाची शक्यता असेल तर संबंधित कुटुंबाला ग्राममपंचायतमध्ये बोलावून अथवा त्यांच्या घरी समितीने भेट देऊन संबंधित कुटुंबाचे समुपदेशन करावे व बालविवाहापासून परावृत्त करावे. ही जबाबदारी ग्राम बाल संरक्षण समितीची असून समुपदेश करुन सुध्दा समितीचे म्हणणे ऐकत नसेल तर ग्राम बाल संरक्षण समितीच्या अध्यक्ष्यांनी, समितीच्या सदस्यांनी किंवा इतर कोणत्याही नागरिकांनी ही बाब तात्काळ जवळचे पोलीस स्टेशन तसेच चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098  किंवा 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, हिंगोली यांना तातडीने अवगत करावे. याबाबत माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णत गोपनीय ठेवण्यात येईल, आपल्या गावामध्ये बालविवाह होत असल्यास ग्राम बाल संरक्षण समितीने बालविवाह रोखण्याकडे दुर्लक्ष केले तर प्रशासनास नाईलाजास्तव ग्राम बाल संरक्षण समितीच्या विरुध्द कारवाई करावी लागेल, याची गांभीयांने नोद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

 

*****

No comments: