14 March, 2018

कळमनुरी येथे महिला व युवतींकरीता हेअर स्टाईल व मेकअपचे तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन


कळमनुरी येथे महिला व युवतींकरीता हेअर स्टाईल व मेकअपचे
 तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
        हिंगांली,दि.14: कळमनुरी येथे दिनांक 8 मार्च च्या महिला दिनानिमित्त महिला व युवतींकरिता हेअर स्टाईल व मेकअपचे तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 26 ते 28 मार्च 2018 या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र यांच्याद्वारा आयोजित  करण्यात येत आहे . या कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त  होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
00000

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वंचित


छत्रपती  शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वंचित
शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
        हिंगांली,दि.14: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून करण्यात आले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या योजनेअंतर्गत यापूर्वीच्या विहीत कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करुन योजनेचे लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यानुसार सदरचे वंचित शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचा कालावधी  दि. 1 मार्च ते दि. 31 मार्च, 2018 असा असणार आहे. मात्र यापूर्वी या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत.
            सदर कालावधीत आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांचे  ऑनलाईन  अर्ज स्विकारण्यात येतील किंवा शेतकऱ्यांना https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी  करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येतील , शेतकऱ्यांसाठी  स्वत: किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत माहिती भरुन ऑनलाईन  अर्ज भरण्याची सेवा नि:शुल्क आहे, सदर अर्ज करणाऱ्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे  प्रमाणीकरण  आधार क्रमांकाच्या आधारे बायोमॅट्रीक पध्दतीने किंवा ओटीपीद्वारे केल्यानंतरच संबंधित अर्ज संपूर्ण माहितीसह  अपलोड करण्यात येतील.
            सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक 201802281949524602 असा आहे. छत्रपती शिवाजी महाराज  शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेअंतर्गत  दि. 31 मार्च, 2018 पर्यंत शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन सुधीर मैत्रेवार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे .

0000

13 March, 2018

मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध



मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व 29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली,दि.13:  महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33(1) (ख)  व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा , जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं.25 व 29 या परिसरात  दिनांक 14 मार्च ते 28 एप्रिल 2018  पर्यंत  पोलीस कर्मचाऱ्यांना  वार्षिक गोळीबार  सराव  करण्यास  परवानगी  देण्यात येत आहे . 
 दिनांक 14 , 21 24 , 28 व 31 मार्च आणि 3,7,11,18,21,25, आणि 28 एप्रिल 2018 या दिनांकांस खालील अटीवर  गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. सदर ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे  परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही  व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसिलदार औंढा ना. व पोलीस  स्टेशन हट्टा  यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट व परिसरात  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची प्रसिध्दी करावी, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे .
0000


लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ



  लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ
            हिंगोली,दि.13: गाय व म्हैस  वर्गीय  जनावरांमध्ये  होणाऱ्या  लाळ खुरकुत रोगामुळे जनावराची  उत्पादकता  व कार्यक्षमता  कमी होऊन  मोठ्या प्रमाणात  पशुपालकांचे  आर्थिक  नुकसान होऊ  शकते. सदरील  रोगाचा प्रादुर्भाव  नियंत्रणात ठेवण्याकरिता  पशुसंवर्धन विभागामार्फत  वार्षिक दोन फेरीमध्ये  संपूर्ण  राज्यात  लाळ खुरकुत  रोग प्रतिबंधक  लसीकरण  करण्यात येते . या कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यास  एकूण 3 लाख 42 हजार 300 लस मात्रा प्राप्त झालेल्या  असून जिल्ह्यातील  संपूर्ण  100 टक्के  गाय व म्हैस  वर्गीय जनावरांमध्ये  लसीकरण करण्यात येणार आहे . सदरील  लसमात्रा जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय  दवाखान्यास  पुरवठा करण्यात आलेल्या  असून जिल्ह्यात  मोहीम स्वरुपात  लसीकरण  राबविण्यात  येणार आहे .  ही मोहीम ही 21 दिवसांत पूर्ण करावयाची असून दिनांक 14 मार्च पासून प्रत्यक्ष लसीकरणास प्रारंभ  करण्यात येणार आहे .  या मोहिमेदरम्यान  जिल्ह्यातील  सर्व पशुपालकांनी  लाळ खुरकुत रोगापासून  आपलया जनावरांचा  बचाव  करण्याकरिता  संबंधित  पशुवैद्यकीय  दवाखान्यात  संपर्क  साधून आपापल्या  जनावरांस लाळ खुरकुत  रोग प्रतिबंधक लसीकरण  करवून घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

09 March, 2018

राज्य अनुसूचित जाती /जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल सदस्य (विधी) यांचा जिल्हा दौरा



राज्य अनुसूचित  जाती /जमाती आयोगाचे
सदस्य सी.एल. थूल सदस्य (विधी) यांचा जिल्हा दौरा
हिंगोली,दि.09: न्या. श्री. सी.एल. थूल , सदस्य (विधी)  राज्य अनुसूचित  जाती /जमाती  आयोग  हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.      दिनांक 11 मार्च 2018 रोजी  दुपारी 1.00 वाजता औंढा नागनाथ येथील  शासकीय  विश्रामगृह येथे आगमन,  दुपारी 1.00 ते 2.00 पर्यंत आयोजित धम्म परिषदेत मार्गदर्शन, जात पडताळणी समिती हिंगोली यांच्यासोबत एकूण प्रकरणांच्याबाबत आढावा बैठक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत अनु. जाती /जमाती  अत्याचार  प्रतिबंधक  कायद्यातंर्गत आढावा बैठक. सायं. 5.00 वाजता  औंढा नागनाथ  येथून नांदेडकडे रवाना होतील .000