26 July, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही ;  

02 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, तर 19 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर 02 रुग्ण बरे झाल्यांने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज घडीला जिल्ह्यात एकूण 19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. 03 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 11 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 988 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 582 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 387 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****  

 

जात प्रमाणपत्राबाबत 27 जुलै रोजी आयोजित केलेले ऑनलाईन वेबिनार रद्द

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 :  येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी दि. 27 जुलै, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे हे वेबिनार रद्द करण्यात आले आहे. तसेच पुढील वेबिनारच्या आयोजनाची तारीख व वेळ स्वतंत्ररित्या करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****


 

कारगील विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कारगील विजय दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शहिदांना अभिवादन केले.   

यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, माजी सैनिक केशव भडंगे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील संजय केवटे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी- कर्मचारी यांनी मौन पाळून शहिदांना श्रध्दांजली वाहिली. तसेच शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*****

25 July, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 02 रुग्ण ;  तर 21 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात 02 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे  सेनगाव परिसरात 02 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. 03 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 11 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 988 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 580 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 21 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 387 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****  

 

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय )

 

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर

मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

 

मुंबई दि. 25 : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.        

27 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मिडीया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे,संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

****

 

24 July, 2021

 जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 07 रुग्ण ;  तर 05 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

19 रुग्णांवर उपचार सुरु, एका रुग्णांचा मृत्यू

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात 07 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे कळमनुरी परिसरात 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे सेनगाव परिसरात 06 व्यक्ती असे एकूण 07 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 05 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 08 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. 03 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 11 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 986 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 580 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 387 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****  

23 July, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 04 रुग्ण ;  तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज

18 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात 04 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे सेनगांव परिसरात 01 व्यक्ती व कळमनूरी परिसरात 01 व्यक्ती असे एकूण 04 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 01 रुग्ण बरा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 07 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 02 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 09 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 979 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 575 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 18  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 386 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****