31 December, 2021

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याकरिता नवीन आदेश जारी

 

  ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार जगभर अत्यंत वेगाने होत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये देखील ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे. ओमायक्रॉनची लागण होण्याचे प्रमाण गत आठवड्यात वाढल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने लग्नसराई, इतर सणवार व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सद्यस्थितीत नवीन ओदश लागू करण्यात आले आहेत.

लग्न समारंभ मोकळ्या मैदानावर, बंदिस्त सभागृहात अथवा कोठेही आयोजित करण्यासाठी केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी असेल, कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम जसे कि सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी कार्यक्रम मोकळ्या मैदानावर, बंदिस्त सभागृहात अथवा कोठेही आयोजित करण्यासाठी केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी असेल,अंतिम विधी, अंत्य यात्रेसाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी असेल, ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हे आदेश दि.३१ डिसेंबर,२०२१ रोजी रात्री १२.०० पासून हिंगोली जिल्ह्यात लागू करण्यात येत आहे. तसेच या व्यतिरिक्त असणाऱ्या बाबी, सूचना कोरोना निर्बंध, मार्गदर्शक सूचना  पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येऊन संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथ रोग प्रतिबंध कायदा १८९७ यानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची असेल, असे जिल्हा आपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000

 

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

 


          हिंगोली, (जिमाका) दि. 31 : जिल्ह्यात कोरोना (कोविड-19)  ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त चालू आहे. दि. 31 डिसेंबर 2021 रोजी वर्षाचा शेवटचा दिवस असून लोक नववर्षाचे स्वागत करतात. यावेळी सर्व समाजातील लोक नववर्ष मोठ्या प्रमाणात व जल्लोषाने साजरा करतात. दि.1 जानेवारी, 2022 रोजी भीमा कोरेगाव अनुषंगाने जिल्ह्यात काही ठिकाणी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

दि. 01 नोव्हेंबर, 2021 रोजी पासून हिंगोली, कळमनुरी, वसमत या तिन्ही आगारातील समस्त कर्मचारी यांनी सामुहिक संप पुकारलेला आहे. जोपर्यंत राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करुन घेणार नाहीत तो पर्यंत संप मागे घेणार नाही असा ईशारा दिला आहे. तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 27 डिसेंबर, 2021 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 11 जानेवारी, 2022 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी  आदेश काढले आहेत.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

30 December, 2021

मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन 31 डिसेंबर व नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन

      मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन हा नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य आहे.

या संक्रमण रोगाचा प्रभाव पाहता, दिनांक ३१ डिसेंबर, २०२१ व नूतन वर्ष, २०२२ चे स्वागत करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने दि.३१ डिसेंबर २०२१ रोजी व दि.०१ जानेवारी, २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या उपरोक्त दि.२४.१२.२०२१ रोजीच्या आदेशान्वये राज्यात दि.२५ डिसेंबर, २०२१ पासून रात्री ९.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.  या आदेशांचे पालन करण्यात यावे, कोव्हीड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दि.२७.११.२०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच शासन आदेश मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय, मुंबई यांनी  दि.२४ डिसेंबर, २०२१ अन्वये दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, ३१ डिसेंबर, २०२१ व नूतन वर्ष, २०२२ चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या ५०% पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५% च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी राहील. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे,त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण व्यवस्था करण्यात यावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे, ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक,  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत,नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) पालन करावे. तसेच संबंधितानी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात , फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे,कोव्हीड-१९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणूच्या प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील.

या आदेशातील सूचनांचे नागरिकांनी, संबंधितांनी तंतोतत पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता १८६०, साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.-न.पं, तसेच संबंधित अधिकारी यांची असेल, असे  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

 

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 1 जानेवारी रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजन

  

 क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.1 जानेवारी, 2022 रोजी  कोव्हीड-19 या महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करता ऑनलाईन, व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात येणार आहे.  15 ते 19 या वयोगटातील सहभागी कलाकारांनी आपले लोकनृत्य 20 साथसंगतसह 15 मिनिटांच्या मर्यादेत तर लोकगीत 10 साथसंगतसह 7 मिनिटांच्या मर्यादेतील सादरीकरण हे विद्यालय, महाविद्यालयाच्या रंगमंचावर करावे.  

युवक-युवती, युवक मंडळे, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी आपल्या प्रवेशिका मंडळाच्या, शाळेच्या, कॉलेजच्या लेटरपॅड वर कलाकारांचे नाव, जन्म तारीख व स्वाक्षरीसह 1 जानेवारी, 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा हिंगोली येथे प्रत्यक्ष किंवा dsohingoli01@gmail.com तसेच व्हॉट्सॲप क्रमांक- 9527120645, 9423306345 यावर सादर करावेत.

सादरीकरणासाठी क्रीडा कार्यालयाच्या वतीने लिंक तयार केली असून आयोजनाच्या दिनांकास लिंक उपलब्ध करुन देण्यात येईल.  या युवा महोत्सवाचे परीक्षण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे पंचाच्या, निरीक्षकांच्या उपस्थितीत स्पर्धा आयोजनाच्या दिवशी होणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

29 December, 2021

शिष्यवृत्ती माह विशेष मोहिम राबविण्याचे आवाहन

क्रीडा प्रशिक्षक पदासाठी अर्ज करावेत

 



 जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती केंद्रात क्रीडा प्रशिक्षकाची निव्वळ मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रशिक्षकाला प्रतीमहा 15 ते 25 हजार रुपये याप्रमाणे मानधन मिळेल. प्रशिक्षकांचा पर फॉर्मन्स आढळून न आल्यास त्यास हिंगोली जिल्हास्तर खेलो इंडिया केंद्र नियंत्रक व देखरेख  समिती कधीही प्रशिक्षक पदावरुन  दूर करु शकेल. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा. पात्रताधारक प्रशिक्षकांनी आपले अर्ज  क्रीडा कार्यालयाच्या dsohingoli01@gmail.com या ई-मेल आयडीवर आणि त्याची मूळ प्रत कार्यालयीन वेळेत हिंगोली येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिनांक 10 जानेवारी, 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमओद्दीन फारुखी यांनी केले आहे.

000000

 

           

 

28 December, 2021

आत्ममग्न, मेंदुचा पक्षाघात,मतिमंद आणि बहुविकलांग व्यक्तींच्या कल्याणासाठीच्या स्थानिकस्तर समितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

आत्ममग्न, मेंदुचा पक्षाघात,मतिमंद आणि बहुविकलांग व्यक्तींच्या कल्याणासाठीच्या

स्थानिकस्तर समितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, दि. 28 (जिमाका) :  आत्ममग्न, मेंदुचा पक्षाघात, मतिमंद आणि बहुविकलांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 हा कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्याच्या प्रभावी  अंमलबजावणी करीता जिल्हास्तरावर  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  स्थानिकस्तर समिती स्थापन केली जाते.

या समितीमध्ये राष्ट्रीय न्यास (सामाजिक न्याय व अधिकारीता  मंत्रालय भारत सरकार) यांच्याकडे  नोंदणीकृत  स्वयंसेवी  संस्था सदस्य आहे,अशा स्वयंसेवी संस्थेची  निवड करण्याकरीता राष्ट्रीय न्यास यांच्याकडे  नोंदणी  असलेल्या स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 अशा नोंदणीकृत संस्थांनी दिनांक 10 जानेवारी, 2022 पर्यंत जिल्हा समाज कल्याण  अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्याकडे अर्ज  सादर करावेत असे जिल्हा समाज कल्याण  अधिकारी, हिंगोली यांनी आवाहन केले आहे.

0000

शाळाबाह्य दहावी पास, नापास विद्यार्थीनींनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 शाळाबाह्य दहावी पास, नापास विद्यार्थीनींनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 

  जवाहर नवोदय विद्यालय, वसमत येथे  शाळाबाह्य दहावी पास, नापास  विद्यार्थीनींसाठी प्रधानमंत्री कौशल्य  विकास योजना 3.0 अंतर्गत विविध कोर्सेस सुरु करण्यात येणार आहेत.

इच्छुक विद्यार्थींनीनी या कोर्सेस साठी प्रवेश घेण्यासाठी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, वसमत येथील शिक्षक शिवाजी घाटकांबळे (भ्रमणध्वनी क्रमांक - 7697359044) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, वसमत यांनी केले आहे.

00000

27 December, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्णावर उपचार सुरु

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 01 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 64 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 667 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 01 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******

 

वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राची वैधता संपलेल्या वाहन मालकांनी

वाहनाची पुनर्नोंदणी करुन घ्यावी

-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  परिवहनेत्तर संवर्गातील मोटार सायकल, खाजगी मोटार कार इत्यादी वाहनाची  वैधता नोंदणी दिनांकापासून 15 वर्षे झालेली आहे व ज्या वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राची वैधता संपली असेल त्यांनी आपली वाहने पुनर्नोंदणी करुन घेण्यात यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

                  यामध्ये मोटार सायकलच्या एमएच38ए… , एमएच38एच… आणि मोटार कार यांच्या एमएच38… या नोंदणी क्रमांक सिरीजचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी आपल्या वाहनाचा नोंदणी दिनांक तपासून वाहनाची पुनर्नोंदणी करुन घ्यावी.

                  वाहनाची पुनर्नोंदणी करण्यासाठी शासनाकडून केंद्रीय मोटार (23 वी सुधारणा) नियम 2021 नुसार वाहन 15 वर्षे जुन्या परिवहनेत्तर वाहनाची पुनर्नोंदणी फिसमध्ये आठ पट वाढ होणार आहे. तसेच वाहन पुनर्नोंदणीसाठी उशीर झाल्यास विलंब शुल्क देखील आकारला जाणार आहे. हा नियम 01 एप्रिल, 2022 पासून लागू होणार आहे. तसेच ज्या परिवहन वाहनाची योग्यता प्रमाणपत्राची वैधता समाप्त झालेली आहे किंवा ज्या परिवहन वाहनाचा मोटार वाहन कर, पर्यावरण कर थकीत आहे त्यांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व वाहनावरील थकीत कराचा तातडीने भरणा करावा.

                  हिंगोली येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन नोंदणीची वैधता संपलेल्या वाहन, योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या आणि थकीत मोटार वाहन, पर्यावरण कर प्रलंबित असलेल्या वाहनावर कार्यवाही करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व वाहन मालकांनी नोंदणी प्रमाणपत्राची वैधता संपलेल्या वाहनाची पुनर्नोंदणी करुन घ्यावी. वाहन मालकांना काही अडचण असल्यास त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

*****

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी

पात्र लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास , भोजन व अन्य सुविधाअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी , 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात , शिक्षण संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत सन 2020-21 व 2021-22 साठी 31 डिसेंबर, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण, हिंगोली  यांनी केले आहे.

योजनेचे निकष : विद्यार्थी शासकीय वसतिगृहास प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेड्यूल्ड  बँक खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त  नसावे. विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा. (ज्या महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी, ते महाविद्यालय, शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालिका, ग्रामपंचायत यांच्या हद्दीत आहे, त्या महानगरपालिका, ग्रामपंचायत येथील रहिवाशी नसावा). नगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालय, शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी सुध्दा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. विद्यार्थी 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. 12 वी मध्ये विद्यार्थ्यांस किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी, पदव्यूत्तर शिक्षणासाठी लाभ घेता येईल. या योजनेचा पुढे लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास अभ्यासक्रमाचे मागील प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 50 टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन , सीजीपीए असणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. त्यांना गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. या योजनेसाठी  खास बाब सवलत लागू राहणार नाही.

विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा, आधार कार्डची सत्यप्रत, बँक पासबूक सत्यप्रत, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अडीच लाखाच्या आत, फॉर्म नंबर 16, विद्यार्थी दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी, 11 वी, 12 वी व पदवी परीक्षेचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईट सर्टीफिकेट, विद्यार्थींनी विवाहित असल्यास पतीचा उत्पन्नाचा पुरावा, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा, विद्यार्थ्यांने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इ. ) , महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परिक्षेच्या निकालाची प्रत, अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना http://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. गरजू विद्यार्थ्यांनी तो संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिह्यामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज सादर करावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75 टक्के आवश्यक राहील. याबाबत संबंधित संस्थेचे उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नौकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.    

*****

 

ऐनवेळी अक्षदा पडण्यापूर्वी एकाच दिवशी साखरा येथील दोन बाल  विवाह थांबविण्यात

जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  सेनगाव तालुक्यातील साखरा येथे दोन अल्पवयीन मुलीचा बाल विवाह दि.24  डिसेंबर 2021 रोजी ऐनवेळी लावून दिला जात असल्याची तक्रार चाईल्ड लाईनला मिळाली असता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन यांच्या हस्तक्षेपामुळे सदरील बाल विवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.

            सध्याच्या लगिन सराईला वेग आला असता सेनगाव तालुक्यातील मौजे साखरा गावात बाल विवाहाचे नियोजन झाले होते. बाल विवाह होत असल्याची चाहुल लागताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे,  बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण,  सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, डाटा एन्ट्री ऑपरेटर राहुल सिरसाट,  क्षेत्र बाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत तर चाईल्ड लाईनचे विकास लोनकर, टिम मेंबर तसेच सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे, सहा.पोलीस निरीक्षक मोपडे तसेच त्यांची टिम यांनी घटनास्थळी पोहोचून सदर घटनेची चौकशी केली असता बालिकेचे वय 18 वर्षापेक्षा कमी होते.

संबंधित गावातील ग्रामसेवक आर.एस. गोरडे, सरपंच अशोक मणिकराव इंगळे, पोलीस पाटील संगीता शरद चवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अंगणवाडी ताई व मुलीचे आई-वडील व मामा यांची भेट घेतली. बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे.  या गुन्ह्यास 1 लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बाल विवाहाच्या दुष्परिणामाविषयी समुपदेशन करण्यात आले व ग्राम बाल संरक्षण समिती समक्ष मुलीच्या आई-वडिलाकडून मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत करणार नाही, असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला व या बालिकेला मा.बाल कल्याण समिती हिंगोली यांच्या समोर सादर करण्यात आले, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी , हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

 


जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा गौण खनिज अधिकारी रविंद्र मारबते, नायब तहसीलदार डी. एस. जोशी  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

25 December, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्णावर उपचार सुरु

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 01 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 64 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 667 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 01 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******

 

बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात अधिकचे निर्बंध लागू

  • रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत एकत्र येण्यास मज्जाव
  • सर्व प्रकारच्या समारंभात उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार जगभर अत्यंत वेगाने होत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉन बाधितांची संख्या 88 असल्याचे आढळले आहे. ओमायक्रॉनची लागण होण्याचे प्रमाण गत आठवड्यात वाढल्याचे दिसून येत आहे. नाताळ, लग्नसराई, इतर सणवार व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे.

त्यामुळे बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सद्यस्थितीतील निर्बंधापेक्षा अधिक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

1. शासनाने नाताळ सण साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या असून त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे सूचनांचे पालन करण्यात यावे.

2. विवाह समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 100 च्या मर्यादेत असेल. असे समारंभ मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त 250 व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.

3. अन्य सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये जेथे लोकांची सतत उपस्थिती राहील असे कार्यक्रम बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी जास्तीत जास्त 100 उपस्थितांची मर्यादा पाळावी. असे समारंभ मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त 250 व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.

4. वर नमूद केलेल्या कार्यक्रमा व्यतिरिक्त इतर कार्यक्रमाचे आयोजन बंद जागेमध्ये करीत असताना आसन व्यवस्था फिक्स असलेल्या ठिकाणी त्या जागेच्या 50 टक्के क्षमतेच्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. तसेच बंद जागेमध्ये परंतु आसन व्यवस्था फिक्स नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करीत असताना व आसन व्यवस्था त्या जागेच्या 25 टक्के क्षमते इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. असे कार्यक्रम मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना त्या जागेच्या 25 टक्के पेक्षा अधिक उपस्थिती राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

5. क्रीडा स्पर्धा व सामन्याचे आयोजन करताना प्रेक्षक क्षमतेच्या जास्तीत जास्त 25 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी.

6. रेस्टॉरंट, जिम, स्पा, सिनेमा व नाट्यगृहे तेथील आसनक्षमतेच्या 50 टक्के मर्यादेच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास मुभा राहील. परंतु तेथे एकूण आसनक्षमता व परवानगी देण्यात आलेली 50 टक्के क्षमता याबाबत सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावा.

7. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मज्जाव राहील.

8. तसेच यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार निर्गमित केलेले कोरोना निर्बंध, मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. 

त्यानुसार वरीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत असून सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येऊन संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 यानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल.

*****

24 December, 2021

 जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्णावर उपचार सुरु

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 01 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 64 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 667 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 01 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******

 


जिल्ह्यातील बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी

बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावेत

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्ह्यातील बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी विशेष लक्ष द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना श्री. पापळकर म्हणाले, बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी तालुका बाल संरक्षण समिती संदर्भातील सुचना फलक प्रत्येक तहसील कार्यालयात लावावेत. तसेच प्रत्येक ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम बाल संरक्षण समितीचे सूचना फलक लावावेत, अशा सूचना दिल्या. तसेच  कोविड आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य मिळण्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या http://mahacovid19relief  या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी üकेले .

 या बैठकीमध्ये समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी कक्षाने राबविलेले विविध जनजागृती कार्यक्रम, जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य व सदस्य सचिवांना दिलेले प्रशिक्षण तसेच कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी तसेच जिल्ह्यातील बालगृह आणि त्यातील बालकांची कोविड काळात घेतली जात असलेली काळजी या विषयाची माहिती दिली.

             या बैठकीस पोलीस अधीक्षक यांचे Óप्रतिनिधी, विशेष बाल पोलीस पथक अधिकारी, जिल्हा आरोग्यê अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, üüबाल न्याय मंडळ üसदस्य, बाल कल्याण समिती सदस्य, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडीत, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ती úरेशमा पठाण, चाईल्ड लाईनÔमेंबर विकास लोनकर आदी उपस्थित होते.ê

*****

23 December, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्णावर उपचार सुरु

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 01 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 64 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 667 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 01 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे.

*******