राष्ट्रीय लोकअदालतीचे 11 डिसेंबर रोजी आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 09 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई
यांच्या निर्देशानुसार दि. 11 डिसेंबर, 2021 रोजी हिंगोली जिल्हा मुख्यालयी व जिल्ह्यातील
सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने येथील जिल्हा न्यायालयात व
त्याअंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ हिंगोली
यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे शनिवार, दि. 11 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी
10.30 वाजता हिंगोली न्यायालय परिसरात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात
नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोडयुक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक,
कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अपराध नियम 138 खालील प्रकरणे, वाद पूर्व
प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात
आलेली आहेत. ही सर्व प्रकरणे आपापसातील तडजोडीद्वारे निकाली काढता येऊ शकतील.
त्यामुळे या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी कोविड-19 च्या
सर्व शासकीय सूचनांचे, आदेशाचे पालन करुन उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन
हिंगोली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष
जिल्हा न्यायाधीश-1, हिंगोली व
वकील संघाच्या अध्यक्षांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment