05 December, 2021

 





स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी

पेडगाव येथे वनराई बंधारा तयार करण्यासाठी केले श्रमदान  

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 05 :  भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून प्रवाहीत नाल्यामध्ये लोकसहभागातून विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यात सर्वत्र एकाच दिवशी म्हणजे  दि. 5 डिसेंबर, 2021 रोजी वनराई बंधारे तयार करण्यास सुरुवात केली आहे.

हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथे आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी स्वत: पाण्यात उतरत वनराई बंधारा तयार करत श्रमदान केले आहे. जिल्हाधिकारीच थेट पाण्यात उतरल्याने प्रशासनातील इतर अधिकारीही यात सहभाग घेऊन श्रमदान केले. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी तब्बल तासभर श्रमदान करत हा बंधारा पूर्ण केला.

यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती होती.

*****

No comments: