24 December, 2021

 


जिल्ह्यातील बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी

बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावेत

-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्ह्यातील बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी विशेष लक्ष द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना श्री. पापळकर म्हणाले, बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी तालुका बाल संरक्षण समिती संदर्भातील सुचना फलक प्रत्येक तहसील कार्यालयात लावावेत. तसेच प्रत्येक ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम बाल संरक्षण समितीचे सूचना फलक लावावेत, अशा सूचना दिल्या. तसेच  कोविड आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य मिळण्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या http://mahacovid19relief  या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी üकेले .

 या बैठकीमध्ये समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी कक्षाने राबविलेले विविध जनजागृती कार्यक्रम, जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य व सदस्य सचिवांना दिलेले प्रशिक्षण तसेच कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी तसेच जिल्ह्यातील बालगृह आणि त्यातील बालकांची कोविड काळात घेतली जात असलेली काळजी या विषयाची माहिती दिली.

             या बैठकीस पोलीस अधीक्षक यांचे Óप्रतिनिधी, विशेष बाल पोलीस पथक अधिकारी, जिल्हा आरोग्यê अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, üüबाल न्याय मंडळ üसदस्य, बाल कल्याण समिती सदस्य, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडीत, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ती úरेशमा पठाण, चाईल्ड लाईनÔमेंबर विकास लोनकर आदी उपस्थित होते.ê

*****

No comments: