महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमाचा 8 वा वर्धापन दिन
9 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे
आवाहन
·
कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिनियम
निदर्शनास आणावेत
हिंगोली (जिमाका), दि. 07 : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित
वातावरण प्रदान करण्यासाठी दि. 9 डिसेंबर, 2013 रोजी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक
छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम-2013 अंमलात आलेला आहे.
भारतीय संविधानानुसार महिलांना
समानतेचा, सन्मानाने जगण्याचा तसेच कोणताही व्यापार, व्यवसाय करण्याचा व लैंगिक छळापासून
मुक्त सुरक्षित कार्य वातावरणाचा अधिकार आहे. अधिकाधिक महिलांना आर्थिक उपक्रमांमध्ये
सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महिलांचा सन्मान राखण्याची तसेच या कायद्याच्या
तरतुदीचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक नियोक्त्याची आहे.
त्याअनुषंगाने महिला व बालविकास
मंत्रालयाने या महत्वपूर्ण कायद्याच्या अधिसूचनेचा
दि. 9 डिसेंबर, 2021 रोजी 8 वा वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवशी महिलांचे
लैंगिक छळापासून संरक्षण हे अधिनियम कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या
निदर्शनास आणावा. तसेच ज्या शासकीय, निमशासकीय,
खाजगी आस्थापनात 10 किंवा 10 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतील अशा प्रत्येक
नियोक्त्याने आपल्या कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे आवाहन
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment