30 December, 2021

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 1 जानेवारी रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजन

  

 क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.1 जानेवारी, 2022 रोजी  कोव्हीड-19 या महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करता ऑनलाईन, व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात येणार आहे.  15 ते 19 या वयोगटातील सहभागी कलाकारांनी आपले लोकनृत्य 20 साथसंगतसह 15 मिनिटांच्या मर्यादेत तर लोकगीत 10 साथसंगतसह 7 मिनिटांच्या मर्यादेतील सादरीकरण हे विद्यालय, महाविद्यालयाच्या रंगमंचावर करावे.  

युवक-युवती, युवक मंडळे, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी आपल्या प्रवेशिका मंडळाच्या, शाळेच्या, कॉलेजच्या लेटरपॅड वर कलाकारांचे नाव, जन्म तारीख व स्वाक्षरीसह 1 जानेवारी, 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा हिंगोली येथे प्रत्यक्ष किंवा dsohingoli01@gmail.com तसेच व्हॉट्सॲप क्रमांक- 9527120645, 9423306345 यावर सादर करावेत.

सादरीकरणासाठी क्रीडा कार्यालयाच्या वतीने लिंक तयार केली असून आयोजनाच्या दिनांकास लिंक उपलब्ध करुन देण्यात येईल.  या युवा महोत्सवाचे परीक्षण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे पंचाच्या, निरीक्षकांच्या उपस्थितीत स्पर्धा आयोजनाच्या दिवशी होणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

No comments: