आत्ममग्न, मेंदुचा पक्षाघात,मतिमंद आणि बहुविकलांग व्यक्तींच्या
कल्याणासाठीच्या
स्थानिकस्तर समितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 28 (जिमाका) : आत्ममग्न, मेंदुचा पक्षाघात, मतिमंद
आणि बहुविकलांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 हा कायदा
करण्यात आलेला आहे. या कायद्याच्या प्रभावी
अंमलबजावणी करीता जिल्हास्तरावर
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
स्थानिकस्तर समिती स्थापन केली जाते.
या समितीमध्ये राष्ट्रीय न्यास (सामाजिक
न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार)
यांच्याकडे नोंदणीकृत स्वयंसेवी
संस्था सदस्य आहे,अशा स्वयंसेवी संस्थेची
निवड करण्याकरीता राष्ट्रीय न्यास यांच्याकडे नोंदणी
असलेल्या स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अशा नोंदणीकृत संस्थांनी दिनांक 10 जानेवारी,
2022 पर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद, हिंगोली यांच्याकडे अर्ज
सादर करावेत असे जिल्हा समाज कल्याण
अधिकारी, हिंगोली यांनी आवाहन केले आहे.
0000
No comments:
Post a Comment