14 December, 2021

 अल्पसंख्यांक हक्क दिवसाचे 18 डिसेंबर रोजी आयोजन

अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांनी ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 14 : संयुक्त राष्ट्रसंघटनेने दि. 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय , वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रस्तृत केला आहे. त्यानुसार दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा केला जातो. त्यास अनुसरुन अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी कोविड-19 च्या विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लोक सहभागाबाबत देखील 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून साजरा करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच या दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव, माहिती करुन देण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने दि. 18 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 11.45 वाजता जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत https://meet.google.com/ooy-wryr-ipy  या लिंकवर ऑनलाईन वेबिनार पध्दतीने साजरा करण्यात येत आहे.

अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी वरील लिंकवर जॉईन होऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

***** 

No comments: