सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 10 :
कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये
व वसतिगृहे सुरु करण्यासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
इयत्ता आठवी ते दहावीचे शालेय विद्यार्थी, इयत्ता
दहावी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक
अभ्यासक्रम वगळून), तसेच बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये
प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि एम.ए., एम.कॉम., एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर
, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रमाच्या (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी
दि. 20 डिसेंबर, 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी
दि. 31 डिसेंबर, 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.
प्रवेश घेण्यास
इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांनी 1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतीगृह,
वसमत जि.हिंगोली या वसतिगृहाचे गृहपाल श्रीमती गीतांजली पडलवार मो.7588584735, 2) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतीगृह,
कळमनुरी जि.हिंगोली या वसतिगृहाचे गृहपाल गजानन बिहाडे मो. 8459420262, 3) डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतीगृह, हिंगोली जि.हिंगोली या वसतिगृहाचे गृहपाल गजानन बिहाडे मो. 8459420262, 4) मागासवर्गीय मुलांचे
शासकीय वसतीगृह, सेनगांव जि.हिंगोली या वसतिगृहाचे गृहपाल विजय सोनटक्के मो. 8830027181,
5) मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह, वसमत जि.हिंगोली या वसतिगृहाचे गृहपाल श्रीमती गीतांजली
पडलवार मो. 7588584735, 6) मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतीगृह, कळमनुरी, जि. हिंगोली
या वसतिगृहाचे गृहपाल गजानन बिहाडे मो. 8459420262,
7) मागासवर्गीय व आर्थिक दुष्ट्या
मागासवर्गीय मुलीचे शासकीय सतीगृह, हिंगोली
जि. हिंगोली या वसतिगृहाचे गृहपाल श्रीमती
सिंधु राठोड मो. 9822009802, 8) मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतीगृह (नवीन), हिंगोली जि.हिंगोली या वसतिगृहाचे गृहपाल श्रीमती सिंधु
राठोड मो. 9822009802 यांच्याशी संपर्क साधावा.
ईच्छूक विद्यार्थ्यांनी वरील वसतिगृहाशी
प्रत्यक्ष संपर्क साधून वरील वेळापत्रकानुसार कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अर्ज सादर
करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी. जास्तीत
जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment