अल्पसंख्यांक हक्क
दिनानिमित्त ऑनलाईन वेबिनारचे आयोजन
अल्पसंख्यांक समाजातील
नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : अल्पसंख्यांक
विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी कोविड-19 च्या विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी
विचारात घेता केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लोक सहभागाबाबत देखील
18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून साजरा
करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच या दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्याकांना त्यांच्या
घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव, माहिती करुन देण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने दि. 18 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी
11.45 वाजता जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत https://meet.google.com/ooy-wryr-ipy या लिंकवर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी वरील लिंकवर जॉईन
होऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment