आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत संसाधन व्यक्ती पदासाठी
10 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 02 : आत्मनिर्भर भारत
पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) या केंद्र पुरस्कृत
योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी
सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची (Panel of Resource Persons) तयार
करावयाची आहे.
संसाधन
व्यक्ती या पदासाठी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान या विषयासंबंधी पदवी, पदविकाधारक व अनुभव
असलेल्या व्यक्तींना प्रथम प्राधान्य, अन्नशास्त्र
व तंत्रज्ञान या विषयासंबंधी पदवी, पदविकाधारक व अनुभव नसलेल्या व्यक्तींना द्वितीय
प्राधान्य, कृषी शास्त्रातील पदवी असलेले व डीपीआर बनविण्यासंदर्भात अनुभव असलेल्या
व्यक्तींना तृतीय प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी असलेल्या मार्गदर्शक सूचनेतील
अटी व शर्तीनुसार अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी संस्था पात्र असणार नाही.
संसाधन
व्यक्ती पदासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दि. 10 डिसेंबर, 2021 असा राहील. योजनेच्या
मार्गदर्शक अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रा परिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. महाराष्ट्र
शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ व केंद्र शासनाच्या www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर
सुध्दा योजनेचा तपशील उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
****
No comments:
Post a Comment