11 December, 2021

 

हिंगोली व सेनगाव तालुक्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी

गावनिहाय पथकाची स्थापना : उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांचे आदेश

 

हिंगोली, (जिमाका) दि. 11 :  शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात दिनांक 13 डिसेंबर, 2021 व 14 डिसेंबर, 2021 रोजी लसीकरणाची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने हिंगोली व सेनगाव तालुक्यातील 75 टक्क्यापेक्षा कमी लसीकरण झालेल्या गावात लसीकरण पूर्ण करण्यासाठी संबंधित गावाचे क्षेत्रीय स्तरावरील सर्व कर्मचारी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वतधान्य दुकानदार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, रोजगार सेवक, ग्रामपंचायत सेवक यांचे गावनिहाय पथक स्थापन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिले आहेत.

या लसीकरण पथकासाठी  नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी या आदेशाची अंमलबजावणी करुन दैनंदिन अहवाल संबंधित तहसीलदारांकडे सादर करावा, असेही आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, पथकातील सदस्याने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध आहे असे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथरोग प्रतिबंध कायदा , महाराष्ट्र राज्य कोविड-19 उपाययोजना 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी, असे आदेश दिले आहेत.

*****

No comments: