13 December, 2021


 

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त

महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंभेरी येथे जनजागृती

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार  आझादी का अमृत महोत्सव-2021 निमित्त  मौजे अंभेरी ता. जि. हिंगोली येथील  ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात  आला.

यावेळी  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी(संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे  यांनी बालकांचे हक्क व योजना, बालकांचे अधिकार, बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 या कायद्याबाबत पीपीटीव्दारे सादरीकरण करुन बालकांसंदर्भात महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत माहिती दिली. तसेच बालकांच्या  कायद्यांविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच सुशिला ठोके, उपसरपंच प्रदुम्न सातव,  ग्रामपंचायत सदस्य राजू ठोके, पोलीस पाटील धोंडीभाऊ राऊत, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने  उपस्थित  होते.

***** 

No comments: