आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त
महिला व बालविकास विभागाच्या वतीने औंढा नागनाथ येथे जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हा माहिला
व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल सरंक्षण
अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आझादी का अमृत महोत्सव, आंतरराष्ट्रीय
दत्तक महिना आणि बाल हक्क सप्ताहानिमित्ताने औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालय, ग्रामीण
पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दि. 1 डिसेंबर, 2021 रोजी जनजागृती कार्यक्रम
घेण्यात आला.
यावेळी
बाल सरंक्षण अधिकारी गणेश मोरे, डीईओ राहूल सिरसाट, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द
घनसावंत यांनी बालकांचे हक्क व योजना तसेच बालकांच्या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय दत्तक महिना नोव्हेंबर 2021 चे पोस्टर रुग्णालयात लावण्यात
आले व माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. तसेच औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक
शाळेत शिक्षकांना माहिती पुस्तिका देऊन जनजागृती करण्यात आली.
*******
No comments:
Post a Comment