जिल्ह्यात कोविड-19 चा
नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज
हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने
डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र
सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार
63 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 667 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच
कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.
*******
No comments:
Post a Comment