अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी
भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण
शुल्क प्रतिपूर्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : प्रकल्प
अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी कळमनुरी जि. हिंगोली या प्रकल्पाच्या
कार्यक्षेत्राअंतर्गत परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होत असून भारत सरकार शिष्यवृत्ती,
शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती इ. मंजुरीची कार्यवाही केली जाते.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित सर्व अनुसुचित
जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती,
शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती इ. योजनांसाठी शासनाच्या https://mahadbtmahiti.gov.in या वेबसाईटवर
दि. 31 जानेवारी, 2022 पर्यंत अर्ज करावे. या संकेतस्थळावरील तांत्रिक समस्यांसाठी
022-49150800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली
यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment