16 December, 2021

 

ग्रामपंचायत मतदान केंद्र व मतमोजणी परिसरात 144 कलम लागू

 

              हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्य निवडणूक आयोगाने दि.17 नोव्हेंबर, 2021 रोजी निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुकीसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित  केलेल्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात  पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित  राखण्यासाठी  ज्या ठिकाणी मतदान होणार आहे.

त्याअनुषंगाने हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत मतदान केंद्रावर तसेच दि. 22 डिसेंबर, 2021 रोजी होणाऱ्या हिंगोली येथील तहसीलदार यांचे कक्ष तहसील कार्यालय, कळमनुरी येथील प्रशासकीय इमारत सभागृह तहसील कार्यालय, सेनगाव येथील तहसीलदार यांचे कक्ष तहसील कार्यालय, औंढा नागनाथ येथील नायब तहसीलदार महसूल-1 यांचे कक्ष तहसील कार्यालय, वसमत येथील तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभाग हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

वरील मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन तसेच संबंधित पक्षाचे उमेदवाराचे चिन्हाचे प्रदर्शन करणे या करिता दि.21 डिसेंबर 2021 रोजीचे सकाळी 7.30 वाजेपासून ते दि.22  डिसेंबर, 2021 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे.

हे आदेश मतदान करणाऱ्या मतदारास व निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत. हा आदेश निवडणुकीचे कामे हाताळताना  आणि कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण  होऊ नये म्हणून मतदानाची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावी, असेही जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी आदेशित केले आहे.

*******

No comments: