शेळी गट वाटपासाठी
अनुसूचित जातीतील 65 व
अनुसूचित जमातीतील 56
लाभार्थ्यांची निवड
हिंगोली (जिमाका), दि. 15 : येथील
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे सन 2020-21 या वर्षासाठी अनुसूचित जातीतील
65 लाभार्थ्याची व अनुसूचित जमातीतील 56 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
येथील जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत
दि. 14 डिसेंबर, 2021 रोजी विशेष घटक योजनांतर्गत आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी
उपयोजनांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सन 2020-21 या वर्षासाठी शेळी गटाचे
वाटप करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड समितीची
सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त हे सदस्य तसेच सदस्य सचिव म्हणून
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी,
जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्याचे पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.
या निवड समितीमार्फत विशेष घटक योजना व आदिवासी
उपयोजनेतून शेळी गट वाटपासाठी तालुकानिहाय निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांचा तपशील
पुढीलप्रमाणे आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत वसमत तालुक्यातील अनुसूचित
जातीतील महिला प्रवर्गाची 05 व सर्वसाधारण प्रवगाचे 09 लाभार्थी असे एकूण 14 लाभार्थी,
कळमनुरी तालुक्यातील अनुसूचित जातीतील महिला प्रवर्गाच्या 04 व सर्वसाधारण प्रवर्गाच्या
08 लाभार्थी असे एकूण 12 लाभार्थी, औंढा तालुक्यातील अनुसूचित जातीतील महिला प्रवर्गाच्या
02 व सर्वसाधारण प्रवर्गाच्या 06 लाभार्थी असे एकूण 08 लाभार्थी, हिंगोली तालुक्यातील
अनुसूचित जातीतील महिला प्रवर्गाच्या 05 व सर्वसाधारण प्रवर्गाच्या 10 लाभार्थी असे
एकूण 15 लाभार्थी, सेनगाव तालुक्यातील अनुसूचित जातीतील महिला प्रवर्गाच्या 04 व सर्वसाधारण
प्रवर्गाच्या 09 लाभार्थी असे एकूण 13 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातून
अनुसूचित जातीतील 03 अपंग लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेंतर्गत
वसमत तालुक्यातील अनुसूचित जमातीतील महिला प्रवर्गाची 01 व सर्वसाधारण प्रवगाचे 03
लाभार्थी असे एकूण 04 लाभार्थी, कळमनुरी तालुक्यातील अनुसूचित जमातीतील महिला प्रवर्गाच्या
07 व सर्वसाधारण प्रवर्गाच्या 14 लाभार्थी असे एकूण 21 लाभार्थी, औंढा तालुक्यातील
अनुसूचित जमातीतील महिला प्रवर्गाच्या 05 व सर्वसाधारण प्रवर्गाच्या 08 लाभार्थी असे
एकूण 13 लाभार्थी, हिंगोली तालुक्यातील अनुसूचित जमातीतील महिला प्रवर्गाच्या 02 व
सर्वसाधारण प्रवर्गाच्या 07 लाभार्थी असे एकूण 09 लाभार्थी, सेनगाव तालुक्यातील अनुसूचित
जमातीतील महिला प्रवर्गाच्या 02 व सर्वसाधारण प्रवर्गाच्या 05 लाभार्थी असे एकूण 07
लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातून अनुसूचित जमातीतील 02 अपंग लाभार्थ्यांची
निवड करण्यात आली आहे.
*****
No comments:
Post a Comment