नेहरु
युवा केंद्राच्या वतीने आयोजित
वसमत
तालुकास्तरीय भाषण स्पर्धेत मोनिका केंद्रे प्रथम
हिंगोली (जिमाका), दि. 07 : नेहरु युवा
केंद्र हिंगोली, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत दिनांक 2 डिसेंबर, 2021 रोजी डॉ. व्ही. के. पाटील शैक्षणिक संकुल हट्टा ता. वसमत
येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले होते. या स्पर्धेत युवकांचा चांगल्या
प्रकारचा प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत
प्रथम क्रमांक मोनिका देवीदास केंद्रे, द्वितीय
क्रमांक आलिया फातेमा शकील अहमद, तृतीय क्रमांक
अजय धोतरे यांनी पटकावले आहे. या निवड झालेल्या
युवकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या
कार्यक्रमास संकुलनाचे कुलसचिव डॉ. कुलकर्णी, एन.एस.एस. समन्वयक डॉ. स्वामी, डॉ. राजश्री,
डॉ.खानापूरकर, डॉ. धनंजय कहाळेकर आदी मान्यवर
उपस्थित होते. नेहरु युवा केंद्र हिंगोलीचे राष्ट्रीय स्वयंसेवक नामदेव फरकांडे
यांच्यामार्फत हट्टा येथे वसमत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
होते.
*****
No comments:
Post a Comment