जिल्हास्तर खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी निवड चाचणीचे
आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 02 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत
शासनाकडून येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास खेलो इंडिया या कार्यक्रमांतर्गत
कुस्ती या खेळाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी मान्यता प्राप्त झाली आहे.
हे प्रशिक्षण केंद्र हिंगोली जिल्ह्यात
कार्यान्वित करण्यासाठी दिनांक 07 डिसेंबर ते 08 डिसेंबर, 2021 या कालावधीत जिल्हा
क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणीतून निवडण्यात आलेल्या खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण जिल्हा क्रीडा
संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली या ठिकाणी नियमित तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकाकडून
देण्यात येणार आहे.
निवड चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे,
मुला, मुलींचे वय 12 वर्षाच्या आत म्हणजे दिनांक
01 जानेवारी, 2009 नंतरचा व 30 डिसेंबर, 2012 पूर्वीचा जन्म असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या निवडीसाठी 1) शटलरण 6x10, 2)
30 M स्प्रीट, ३) लवचिकता, 4) सिटप्स्, 5) उभ्या ते लांब उडी 6) 1000 मीटर धावणे,
7) रोप चढणे, 8) 200 मीटर धावणे इ. चाचण्या
घेऊन प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे.
यासाठी दिनांक 07 डिसेंबर, 2021 रोजी
सकाळी 10.00 वा. जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली येथे निवड चाचणीचे
आयोजन करण्यात आलेले आहे. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीचा
दाखला, जन्म नोंदीचा दाखला, बोनाफाईड दाखला, दोन रंगीत पासपोर्ट फोटो, आधार कार्ड इत्यादी सोबत आणणे बंधन कारक आहे.
जिल्ह्यातील इच्छुक असलेल्या खेळाडूंना
त्यांच्या क्रीडा शिक्षकांनी व पालकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी करावे, असे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमओद्दीन फारुखी यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment