जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण, तर 02 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
04 रुग्णांवर उपचार
सुरु
हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे, तर 02 रुग्ण बरे झाल्याने त्यांन
डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज घडीला 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार
सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली
आहे.
आज
प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती
कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार
63 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 663 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज
घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात
आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक,
हिंगोली यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment