नेहरु युवा केंद्राच्या
वतीने विजय दिवस साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 20 : दि. 16 डिसेंबर, 1971 रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान युध्दात भारतात
93 हजार पाक सैनिकांनी शरणांगती पत्करली व भारताचा विजय झाला. यामध्ये भारताचे
बरेच सैनिक शहीद झाले. त्या विजयाची आठवण म्हणून 16 डिसेंबर हा दिवस भारतात
दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून नेहरु युवा
केंद्र हिंगोली तथा जिल्हा युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने
जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन आणि
एसआरपीएफ गट क्र. 12 हिंगोली या ठिकाणी विजय दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मंगनाळे, पोलीस कर्मचारी
व एसआरपीएफचे सहायक समादेशक बी. पी. भोटकर, पोलीस उपनिरीक्षक एन.एन. पोतदार,
आर.पी. नागरगोजे, सहायक निरीक्षक सवितकर, हवालदार बेगाळ, महाले, राहटे, कर्मचारी
वर्ग व नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक नामदेव फरकंडे, संदीप शिंदे उपस्थित
होते.
*****
No comments:
Post a Comment