आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त
शिवाजी महाविद्यालयात जनजागृतीचा कार्यक्रम
हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हा माहिला
व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल सरंक्षण
अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आझादी का अमृत महोत्सव, आंतरराष्ट्रीय
दत्तक महिना आणि बाल हक्क सप्ताहानिमित्ताने येथील शिवाजी महाविद्यालयात दि. 1 डिसेंबर,
2021 रोजी जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा
व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे यांनी बालकांचे हक्क व
योजना तसेच बालकांच्या कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
******
No comments:
Post a Comment